या किल्ल्याची अवस्था खूप नाजूक आहे काही दिवसांनी या किल्ल्याचे फक्त नाव आणि आठवण राहील किल्ला खूप पडीक अवस्थेत आहे या किल्ल्याबद्दल जास्त लोकांना कदाचित माहिती नसेल कारण या किल्ल्या भोवती सिडकोच्या मोठमोठ्या गेस्ट हाउसच्या इमारती उभ्या केला आहेत इतकेच नाही तर या किल्ल्या भोवती जाणारी वाटच बंद करून ठेवली आहे पण तरीही काही किल्ले प्रेमींनी ते लोखंडी कुंपण तोडून पुन्हा वाट बनवली आहे
उंच इमारतीमुळे आम्हाला हा किल्ला शोधायला अर्धा तास लागला शेवटी तिथल्या स्थानिक रहिवाशीना विचारून या किल्ल्यावर कसं जायचं याची माहिती आम्हाला मिळाली आपले राजकारणी लोक राजाचं नाव घेऊन सत्ता गाजवतात पण किल्ल्याची डागडुजीकडे मात्र दुर्लक्ष करतात या किल्ल्यावरील शोर्य धुळीस मिळाले आहे
या किल्ल्यावर 11 आणि तटबंदीवर 6 अशा एकूण वीस तोफा होत्या मुंबई बेट, साष्टी, पनवेल या जलमार्गाबरोबर प्रबळगड, मलंगगड, कर्नाळा या किल्लावर नजर रोखण्याची जबाबदारी बेलापूर किल्ला पार पाडायचा. नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल १७३१ साली कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले. पेशव्यांच्या बेफिकिरीमुळे नंतरच्या काळात बिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स याच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरु झाला. सवाई माधवरावांच्या कारकिदीर्त तोतया सुखनिधन नामक कनोजी ब्राह्माणाचे प्रकरण गाजले. पेशव्यांचं किल्लेदार मानेजी आंग्रे या किल्लेदारांनी भामट्याची वरात काढून त्याची रवानगी पुण्याकडे केली. मात्र सदाशिवभाऊंनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केल्याने २३ जून १८१७ साली हा किल्ला पेशव्यांच्या हातून गेला.
या किल्ल्याच्या पायथ्याशी आजही किल्ल्याशी संबंधितांचे वंशज वास्तव्यास आहेत. आजही ऐतिहासिक पाण्याची विहीर १७३२ साली बांधल्याची नोंद असलेली आहे. साधारणत: याच काळातले गायधनी आणि आताचे गोवर्धनी माता मंदिर आहे. आता या प्राचीन मंदिराचा विश्वस्त असलेल्या विधान परिषद सदस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिराचा जीणोर्द्धार हाती घेतला आहे. आज या किल्लाचा एकच बुरुज शाबूत आहे. मात्र काही वर्षांपूवीर् संपूर्ण किल्ला होता. पुकार या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सिडकोच्या बेफीकिरीने मंदिराजवळील मोठा बुरुजही कोसळला. गेस्ट हाऊसचे बांधकाम करताना एक बुरुज पडला. दरसाली अश्विन महिन्यात या किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. आज दुरवस्थेतील हा किल्ला नवी मुंबईची शान आहे याचेच भान संबंधितांना राहिलेले नाही. किल्ल्याच्या आवारात झालेले बांधकाम याचा धडधडीत पुरावा आहे.
उरण परिसरातील खांदेरी उंदेरी सारखे किल्ले टिकवले जात असताना बेलापूर किल्ल्याचे अस्तित्व टिकण्याची आता शाश्वती राहिलेली नाही. महिनाभर झुंज देवून पेशव्यांनी स्वराज्यात दाखल करुन घेतलेला हा किल्ला आता आपल्याच राज्यात अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे शिवरायांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे.
आता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीसाठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे.
आता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीसाठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे.
जर तुम्हाला आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की पाठवा
संपर्क
हितेश खरगांवकर
(किल्लेप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकार )


.jpg)



